नवापूर: जय महाकाल बहुउद्देशीय व सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वास बडोगे यांनी वार्ड क्रमांक 10 मध्ये लहान चिंचपाडा, देवळ फळी, कळंबा परिसरातील पिंपळनेर येथील आदिवासी गुजरातमधून पायी आले आहे, त्यांना अन्नदान केले. मजुरांना सकाळी शिजवलेले अन्न व दुपारून कोरडा शिधा वाटप करण्यात आला. सोबतच त्यांनी तोंडाला लावण्याचे मास्क व साबणाचे वाटपही केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भीमराव गढरी, सामाजिक कार्यकर्ते गोरखभाऊ गढरी प्रा.डॉ.नितीनकुमार माळी,माजी सरपंच वाकी पाडा येथील सलीम मंसूरी, कमलेश खत्री, विद्यमान सरपंच वाकी पाडा येथील नरेंद्र गावित, सलीम मंसूरी, निलेश गावित मकसूद मलिक नितेश गावित सुरेश गावित रवी सकट तवसीप शेख राहुल खंडाळे राजू सय्यद विजय दुबळा सलीम शेख संदीप मावची अनिल बेलदार काळंबा येथून नातू गावित दिलीप गावित संदीप पाटील कल्पेश अग्रवाल किसन काठेवाडी इतर कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.