शहादा : नवापूर पाठोपाठ आता शहादा येथील नगरसेवक शेख इक्बाल शेख सलिम यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने सत्ताधारी गटातून संख्याबळ एक निकामी झाल्याने राजकीय गोटात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शेख इक्बाल शेख सलीम हे वार्ड नंबर 7 ब मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांना 12 सप्टेंबर 2001 नंतर तीन अपत्य असल्याकारणाने अधिनियम 1965 चे कलम 16(के) व 44( एक) प्रमाणे त्यांचे सदस्य रद्द करण्यात आले. त्यांच्याविरोधात नगरसेवक मकरंद नागिन पाटील यांनी दिनांक ३ नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर वेळोवेळी सुनावणी झाली. त्याचा निकाल दिनांक 20 नोव्हेंबर 2018 रोजी लागला. सत्ताधारी गटातील संख्याबळ एक ने कमी झाल्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रभाग सात( ब )मधिल नगरसेवक शेख इक्बाल यांना तीन अपत्ये होती. त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता. परंतु तो दिला नसल्याने आम्ही अर्ज दाखल केला व कायद्याच्या नियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द केल. कायद्याच्या मान राखला गेला त्याबददल जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन. शिवाय रिक्त झालेल्या जागेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा करेल अशी प्रतिक्रिया नगरसेवक मकरंद पाटील यांनी दिली