नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी यांचे दातृत्व : गरजूंना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

दातृत्वाचा झरा : संचारबंदीत संतोष भाऊ दाढी निभावताय आपले कर्तृत्व

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून गोरगरीबांच्या हाताच्या रोजगारही हिरावला गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर आपणही समाजाचं देणं लागतो या सामाजिक बांधीलकीतून शहरातील प्रभाग क्रमांक 16 चे दातृत्ववान नगरसेवक संतोषभाऊ दाढी चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. रविवारीदेखील संतोष दाढी यांनी मित्र परीवारासोबत प्रभागातील सुमारे 730 नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत त्यांना धीर देत अडचणींच्या प्रसंगातही आपण नागरीकांच्या सोबत असल्याचे सांगितले. गरजूंना पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो तेल, दोग किलो तांदूळ, णक किलो तूर दाळ, 225 ग्रॅम चहापत्ती, एक किलो मीठ, हळद व मिरची पावडर देण्ययात आली. प्रभाग क्रमांक 16 मधील पापा नगर, काझी प्लॉट, शनी मंदिर वॉर्ड, सावकारे वाडा, कुंभार गल्ली तसेच प्रभागातील हातावर पोट भरणार्‍या एकूण 730 नागरीकांना मदत देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शंकर चौधरी, नरेंद्र (गुड्डू सेठ) अग्रवाल, अशोक चौधरी, सुरेश चौधरी, महाराज, पप्पू पाली, अमित परदेशी, भूषण किरंगे, ठाकूर आदींची उपस्थिती होती.