जळगाव: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या राका चौकात बुधवारी दुपारी १.२५ वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून नगरसेविका पती धुडकू सपकाळे यांच्यासह एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांचा काही महिन्यांपूर्वी नितीन सोनवणे यांच्यासोबत माणसे पुरविण्यावरून वाद झाला होता. बुधवारी दुपारी काशीनाथ हॉटेलच्या पुढे राका चौकात धुडकू सपकाळे, गजानन देशमुख व संजय चव्हाण हे एका टपरीवर गप्पा करीत उभे होते. यावेळी चारचाकी क्रमांक एमएच.१९.बीजे.१५७ ने आलेल्या चौघांनी त्यांच्यावर तलवार आणि लाकडी दांड्याच्या साहाय्याने हल्ला केला. दरम्यान, नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयूर सपकाळे व भुरा कोळी यांनी हा हल्ला केल्याची माहिती जखमींनी दिली आहे. दोघांना जिल्हा रुग्णालयातून खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे