नगरसेविका बेंडाळे यांची अतिक्रमण काढण्याची मागणी

0

जळगाव । महानगर पालिकेच्या मालकीची सर्वे नं. 483/2 मेहरूण ही जागा आहे. या जागेवर मुलींसाठी अभ्यासिका बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फेत प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात आलेला आहे.

या जागेत पूर्वी भाजी बाजार भरत होता. आता येथे मोकळे ओटे पडलेले आहेत. या मोकळ्या पडलेल्या जागेत आजू-बाजूच्या परीसरातील लोक दररोज टपर्‍या ठेवत आहेत. ही जागा मोकळी करून मिळावी अशी मागणी नगरसेविका उज्वला मोहन बेंडाळे यांनी आयुक्तांना गुरूवार 16 फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे. या जागेवरील मोकळे ओटे व बेवारस टपर्‍या अतिक्रमण विभागास आदेश देवून काढण्याची विनंती या निवेदनात बेंडाळे यांनी केली आहे.