तळेगाव (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडेच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका मंगल भेगडे यांच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांना लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगल भेगडे आपल्या परिवारासोबत रविवारी सायंकाळी 6 वाजता वाकड येथे लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नावरून रात्री 11.30 च्या दरम्यान घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरांनी खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. यामध्ये त्यांनी 18 तोळे सोन्याचे दागिने, घड्याळ व रोख रक्कम असा 3 लाख, 91 हजार, 500 रुपयांचा माल लंपास केला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाजगिरे करीत आहेत.