वाडा । वाडा नगर पंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या कन्या निशा विष्णू सवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपकडून नगराध्यक्ष पदासोबतच अन्य 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज वाडा तहसील कार्यालयात दाखल केले.
वाड्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे असल्याचे आश्वासन यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यावेळी भाजपचे प्रदेश कमिटी सदस्य बाबाजी काठोले, ज्येष्ठनेते मधुकर पाटील, विभागीय सरचिटणीस योगेश पाटील, जिल्हा चिटणीस डॉ. हेमंत सवरा तालुका अध्यक्ष संदीप पवार, पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके व जि. प. महिला व कल्याण सभापती धनश्री चौधरी यासह आदी उपस्थित होते.
तर शिवसेनेकडून अजूनही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला नसल्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे, तर मनसे कडून नगराध्यक्ष पदासाठी अस्मिता शितोळे यांचा अर्ज दाखल करण्यात आले. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच ठेवला असल्याचे समजते.
Next Post