एरंडोल । शहरातील हॉटेल मयुरीच्या मागील जुना कासोदा रोड परिसर गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोक दुःखी ठरत होता. हा रस्ता जिल्हा बांधकाम विभागाकडे कि नगर पालिकेकडे हेच समजत नव्हतं त्यासाठी आमदार डॉ.सतिष पाटील यांनीही संबंधित अधिकार्यांना आमसभेत खडसावले होते.
शहरात स्वच्छता मोहिम
परंतु दुरुस्तीसाठी कोणत्याही विभागाने पुठाकार घेतला नाही. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने वाहन चालकांसह पायी चालणे देखील कठीण झाले आहे. शेवटी रस्त्याची अवस्था पाहून नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी स्वखर्चाने यारस्त्याची दुरुस्ती केली आहे. नगराध्यक्षांनी मुरुम टाकून रास्ता रहदारीसाठी सुरळीत करून दिला आहे. यावेळी कासोदा दरवाजा, अमळनेर दरवाजा व शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दीन शे.कासम, आंनद दाभाडे यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.