दोंडाईचा । येथील शहादा रोड परीसरातील प्रभाग क्र. 1 मध्ये 4 रस्त्यांच्या कामासाठी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी 74 लाखाचा निधी दिला असून या निधीतून लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी सौ. रावल यांच्या हस्ते नुकतेच भूमीपूजन करण्यात आले. 74 लाखाचा भरीव निधी दिल्यामुळे या भागातील सर्व रस्ते चकाचक होणार आहेत. मागील काळात या भागात रस्त्यांची कामे करण्यात आली नसल्यामुळे सर्व बॅकलॉग भरून काढण्यासाठी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी पुढाकार घेतला होता.
यांची होती उपस्थिती
यावेळी ऋषीकेश रावल, ताईसाहेब जमादार, आक्कासाहेब ठाकोर, बांधकाम सभापती निखील जाधव, किशनचंद दोधेजा, छोटू मराठे, सुफीयान तडवी, स्विकृत नगरसेविका चंद्रकला सिसोदिया, जी.पी. चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अल्ताफ शेख, दुध संघाचे तज्ज्ञ संचालक प्रविणसिंग सिसोदिया, जे.एस. पाटील, गोरखसिंग गिरासे, कुलदिप गिरासे, तिलक सिसोदिया, बबलु देवरे, चेतन सिसोदिया, नगरपालिकेचे अभियंता जगदिश पाटील, शिवनंदन राजपूत, आरोग्य विभागाचे शरद महाजन, आर.जे. जमादार आदी उपस्थित होते.
10 वर्षापासून मिळाला नव्हता निधी
प्रभाग क्र.1 मध्ये गेल्या 10 वर्षापासून एकही रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाला नव्हता, म्हणून या भागात रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या भागात रस्ते करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी केली होती. त्याची दखल घेत नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी तात्काळ याठिकाणी रस्त्याच्या कामासाठी 74 लाख रूपये निधी उपलब्ध करून दिल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.