नवापुर। शहरातील माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांच्या ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन अग्रवाल भवन येथे सामाजिक कार्यकर्ता अविनाश बिराडे यांनी केले होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे देवमोगरा मातेची प्रतिमेचे तसेच छञपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करुन माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख हंसमुख पाटील, भाजपचे अनिल वसावे, गणेश वडनेरे, निलेश प्रजापत, डॉक्टर असोशियचे अध्यक्ष कमलेश पाटील, डॉ.जयंवत गिरासे, डॉ.चंद्रशेखर पाटील, व्यारा येथील जनक हॉस्पीटलचे डॉ.तेजश शहा, डॉ.शैलेश शहा, डॉ.जिग्नेश पटेल, डॉ.राजु शहा, अनिल वारुडे, विशाल सांगळे, हरीश दर्जी, हेमंत जाधव, आघाडीचे मंगेश येवले, दर्शन पाटील, इसुब बारडोलीया,मयुर सिंधी, संदिप चौधरी, कालु लोहार, संजु मावची, जितेंद्र अहिरे, विजय सेन, आबा मोरे, संदिप दर्जी, तुराब पठाण आदी उपस्थित होते.