शहादा। येथील नगरपालिकेने खेतीया चार रस्ता पासून मेन रोड, जामा मस्जिद समोर थेट कुकडेल आझाद चौक पर्यंतच्या सुमारे 700 मीटरच्या कांक्रीट रस्त्याचे काम सुरू केले आहे. मुख्य रस्त्यांवर अनेक अडचणी यायच्या, त्यावर मार्ग काढून या रस्त्यांला तब्बल 25 वर्षानंतर पुनर्जिवन मिळाले आहे. नगराध्यक्ष मोतीलाल फकीरा पाटिल यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कामांना गती मिळाली असून आता शहराला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यांचे काम गणेश उत्सव सुरू होण्यापुर्वी पुर्ण करण्यात येणार आहे.
रोड-रस्त्यांचे अभिवचन
शहादा नगर परिषदेच्या गत डिसेंबर 2016 ला निवडणूका झाल्या आहेत. यात भाजपाचे नगराध्यक्षपदी मोतीलाल फकीरा पाटिल हे विजयी झाले. त्यांच्या पक्षातील 10 नगरसेवक विजयी झाले आहेत. निवडणूक प्रचार दरम्यान नवनियुक्त नगराध्यक्ष पाटिल यांनी शहरातील रोड- रस्ते -पाणी – स्वच्छता – शौचालय – घरकुल आवास योजना सह शहराचे विकासाच्या बाबत जनतेस आभिवाचन दिलेले आहे.
स्वच्छतेचा प्रश्न मार्गी
न. पा. वर पदभार स्विकारल्यानंतर नगराध्यक्ष मोतीलाल पाटिल यांनी सर्वात अगोदर सारंखेडा येथील तापी नदिवरून येणा-या पिण्याचे पाणी जे व्हॉलव्दारे लाखो लिटर वाया जात होते. ते थांबविले वृंदावन नगर भागात अनेक वर्षापासून पाण्याचा थेंब भरण्यासाठी पडलेली पाण्याची टाकीत आता भरणा सुरू झाला. शहरातील मुख्य जुन्या तसेच काही नविन वसाहतीत सारंखेडा तापी पुरवठा सुरू झाला आहे. स्वच्छता प्रश्न मार्गी लागला आहे .गल्ली गल्ली -घरा घरा पर्यंत स्वच्छता रथ पोहचून स्वच्छता होत आहे.
रस्त्यांसाठी 69 लाखांचा निधी
शहरातील मुख्य मेन रोड म्हणजे तहसील कार्यालय पासून खेतीया चार रस्ता, जामा मस्जिद समोर हंस क्लाथ समोर, तूप बाजार चौक विनोद शंकर सोनार ज्वेलरी समोर टिळक चौक रामेश्वर मंदिर समोर होत कुकडेल उतरती आझाद चौक हा मुख्य रस्ता आहे. गेल्या 25 वर्षापासून या रस्ताची अवस्था दैनीय होती. पालीकेने रस्ता तयार करण्या अगोदर गटार, पाण्याची पाईप लाईन यांचे काम केलीत. यानंतर सुमारे 700 मी. लांबीचा 63 इंचचा रस्ता तयार करण्याचे काम प्रगति पथावर आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 69 लाख रूपयाचा निधी आहे.