नवापुर । नवापुर शहरातील करंजी ओवारा येथे आदिवासी महिला मंडळ संचलित माजी नगराध्यक्ष स्व.केशवराव गावीत बालवाडी व धडधडया आदिवासी महिला मंडळ एकलव्य बालवाडी येथील 1ते 4 वयोगटातील विद्यार्थाना मोफत शाळेचा गणवेश वाटपाचा कार्यक्रम नगराध्यक्षा रेणुका गावीत व पं.स विस्तार अधिकारी किरण गावीत, शोभा किरण गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
विस्तार अधिकारी किरण गावीत म्हणाले की, गावाचा विकासासाठी गावातील मुलांचा शैक्षणीक विकास होणे गरजेचे आहे. आदिवासी समाजातील काही पालक व्यसनांचा आहारी जाऊन मुलांचा शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात त्यांनी तसे न करता मुलांचा शिक्षणाकडे लक्ष दिले पाहीजे.पुढच्या वर्षी दोन्ही अंगणवाडीतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी दोन्ही अंगणवाडया मध्ये अत्याधुनिक सुविधासाठी प्रयत्न करण्याचा मानस किरण गावीत यांनी व्यक्त केला. तसेच आयुब बलेसरीया यांनी 10हजार रुपयाची मदत दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन न.पा बांधकाम सभापती आयुब बलेसरीया व नगरसेवक आरीफ पालावाला, माजी नगरसेवक रमला राणा,विनय गावीत,नामु गावीत,राजु आगळे,पिन्टया मावची,डी.एन.गावीत,संदिप मावची,प्रकाश मावची,उमेश गावीत,आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन माजी नगरसेवक विनय गावीत यांनी तर आभार शिक्षक उषा मावची यांनी मानले. यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष मीना गावीत, उषा मावची, निकीता गावीत,दक्षा पाटील,हेमा गावीत,अमीता गावीत,ज्योती मावची आदींनी कामकाज पाहिले.