दोषींवर कठोर कारवाईसह आमदारांचे सदस्यत्व रद्दची मागणी
भुसावळ – अहमदनगरचे शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या निर्घूण हत्येचा भुसावळ शिवसेनेने निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसह भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांवर आजीवन निवडणूक लढण्यास बंदी घालावी, शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आदी मागण्यांसाठी गुरुवार, 12 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रशासनाला देण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
श्याम श्रीगोंदेकर, उमाकांत (नमा) शर्मा, मिलिंद कापडे, प्रा.धीरज पाटील, प्रा.गजानन निळे, प्रा.विनोद गायकवाड, ललितकुमार मुथा, राकेश खरारे, नामदेव बर्हाटे, अरुण साळुंके, गोकुळ बाविस्कर, नाना मोरे, सुरज पाटील, मनोहर (पप्पू) बारसे, शरद जोहरे, सोनी ठाकुर, राजेश ठाकुर, शिवाजी दाभट, उमेश चौधरी, निखील सपकाळे, अरुण धनगर, नीलेश हिंगणे, लखन जगताप, ललित निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले.