नगावमध्ये वॉचमनची हत्या करीत टेम्पोसह टाईल्स लांबवल्या

0

तिघा मारेकर्‍यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू

धुळे : तालुक्यातील नगाव येथे चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाची हत्या करीत टेम्पोसह टाईल्स लांबवण्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तीन मारेकर्‍यांनी हे कृत्य केल्याचा संशय असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला.रामदास शिवराम पाटील (68) असे मयत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

नगावमध्ये आदित्य अग्रवाल यांचे श्याम बिल्डींग मॉल असून तेथे पाटील हे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. मंगळवारी मध्यरात्री तीन मारेकर्‍यांनी पाटील यांच्या डोक्यात धारदार शस्त्र मारून त्यांचा खून केला तर तीन लाख रुपये किंमतीचा टेम्पो (एम.एच. 18 ए.ए. 4563 ) व एक लाख रुपये किंमतीच्या टाईल्स लांबवल्या. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरीता भांड या घटना कळताच त्यांनी सहकार्‍यांसह धाव घेत मारेकर्‍यांचा शोध सुरू केला. मयत ़ रामदास पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे़