तरूणाच्या घशात अडकली गोळी
जळगाव । गावठी पिस्तुल हाताळतांना ट्रिगर दाबल्या गेल्याने गोळी थेट दातांमधून घशात जावून सागर रतन भालेराव हा तरूण गंभीर झाल्याची घटना मंगळवारी रामेश्वर कॉलनी येथील मंगलपुरी भागात घडली होती. परंतू, हि घटना नजर चुकीने नव्हे तर विशाल अहिरे या मित्राने समोरून सागरला गोळी मारल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबाब सागर याने पोलिसांना स्वत:च्या हस्ताक्षरात पोलिसांना जबाब लिहून दिले असून त्यावरून विशाल याच्याविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
जेवणासाठी बोलावले नागसेननगरात
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल राजू अहिरे याने मंगळवारी दुपारी १.३० वाजता सागर भालेराव याला नागसेन नगर येथे जेवणासाठी बालवून त्याच्या गप्पा मारल्या. मात्र, दुपारी विशाल याने अचाकन सागरच्या चेहर्यासमोर पिस्तूल रोखून त्याला गोळी मारली. पिस्तूलात दोन काडतूस असल्याने एक राऊंड फायर होवून एक गोळी सागर यांच्या गळ्यात शिरून घशात अटकली. यावेळी विशाल याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, हा प्रकार सागर याचा भाऊ मुकेश याला कळताच त्याने सागरला उपचारार्थ खाजगी रूग्णालयात नेले. दरम्यान, बोलता येत नसल्याने सागर याने बुधवारी जबाब घेण्यासाठी आलेल्या एमआयडीसी पोलिसांना स्वत:च्या हस्ताक्षरात जबाब लिहून देत विशाल याने गोळी मारल्याचे त्याने सांगितले. अखेर बुधवारी रात्री सागरच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल याच्याविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेत करणार होता राऊंड फायर
विशार अहिरे याचा बुधवारी वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी मध्यरात्री हवेत राऊंड फायर करण्यासाठी त्याने गावठी पिस्तुल आणली होती. परंतू, दुपारी झालेल्या वादात चक्क मित्रावर त्याने गोळीबार केला. त्यात सागर गंभीर जखमी झाला. विशाल याच्याविरूध्द या अगोदरही शनिपेठ पोलिस ठाण्यासह जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.