नजर चुकवून हजारो रुपयांचे कपडे लंपास

0

कल्याण । डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात चांदरेश इमारतीमध्ये राहणारे संतोष कुलातंगन यांचे याच परिसरात महालक्ष्मी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानात पाच अज्ञात महिला आल्या.

कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने कपडे बघण्यास सुरुवात केली. संतोष या महिलांना कपडे दाखवत असताना दुसरे ग्राहक आल्याने त्यांनी त्या ग्राहकांना कपडे दाखवण्यास सुरुवात केली. ही संधी साधत या पाच महिलांनी 20 हजार रुपये किमतीचे 40 ड्रेस चोरून नेले. काही वेळाने संतोष यांना दुकानात महिलांनी चोरी केल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत महिला गायब झाल्या होत्या. या प्रकरणी संतोष यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.