नटराजन आणि अनिकेत चौधरी मालामाल

0

बंगळूरू । लिलाव प्रक्रियेत तामिळनाडू आणि राजस्थानच्या दोन डावखुरे गोलदांज मालामाल झाले आहेत. टी नटराजन आणि अनिकेत चौधरी या दोघांवर यंदा कोट्यवधींची बोली लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. टी नजराजन या वेगवान गोलंदाजाला त्याच्या पायाभूत किंमतीच्या 300 टक्के जास्त पैसे मोजून पंजाबने घेतले आहे. नटराजनला किंग्ज इलेव्हनने 3 कोटी रुपयांमध्ये घेतले आहे. यंदाच्या पर्वात टी नटराजन हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर अनिकेत चौधरीला आरसीबीने 2 कोटींमध्ये घेतले आहे. तामिळनाडूमधील चिन्नप्पमपट्टीजवळील सालेममधील गरीब घरात जन्मलेल्या नटराजनसाठी आता चांगले दिवल आहेत. 25 वर्षीय नटराजन वेगात गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 20 वर्षापर्यंत नटराजन टेनिस बॉलने गोलंदाजी करायचा. नटराजनसोबत 27 वर्षीय अनिकेत चौधरी आयपीएलमध्ये कोट्यधीश झाला आहे. राजस्थानचा हा डावखुरा गोलंदाज मिशेल स्टार्कमुळे चर्चेत आला होता. मिशेल स्टार्कचा सराव करण्यासाठी टीम इंडियाने सरावादरम्यान अनिकेत चौधरीला बोलावले होते.