नदालचा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत नवा विक्रम

0

रोलॅड गॅरोस । येथील लाल मातीवर रॅफेल नदालने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोदविला आहे. त्याच्या झंझावात खेळीमुळे नदालने सरळ तीन सेटमध्ये वॉवरिंकवर विजय मिळवून आपल्या नावावर दहावे फ्रेच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेत नोदविले. नदालने स्टॅन वॉवरिंकाचा 6-2, 6-3, 6-1 असा धुव्वा उडवत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दहाव्या विजेतेपदावर मोहोर उमटवली.

नदालने यंदा या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठताना एकही सेट गमावला नव्हता. परंतु नदालच्या सुसाट एक्स्प्रेसपुढे वॉवरिंका सपशेल निष्प्रभ ठरला. नदालने या स्पर्धेत 2005 ते 2008 आणि 2010 ते 2014 या कालावधीत विजेतेपद मिळवले होते. गतवर्षी मनगटाच्या दुखापतीमुळे त्याला तिसर्‍या फेरीतच माघार घ्यावी लागली होती. त्यामुळेच यंदा दहावे विजेतेपदाच्या जिद्दीनेच उतरला होता. कारकीर्दीतील त्याचे हे 15वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

पहिल्या सेटपासूनच वॉवरिंकावर खूप मानसिक दडपण होते. त्याचा प्रत्यय अनेक वेळा दिसून आला.नदालने दुसर्‍या सेटमधील दुसर्‍याच गेममध्ये सव्र्हिसब्रेक मिळवला. या महत्त्वपूर्ण ब्रेकमुळे नदालची बाजू वरचढ झाली. त्याने पासिंग शॉट्सबरोबरच बेसलाइनवरून व्हॉलीजचाही सुरेख खेळ केला. हा सेट त्याने 45 मिनिटांत घेतला. लागोपाठ दोन सेट गमावल्यामुळे वॉवरिंका याच्यावरील दडपण वाढले. त्याचा परिणाम तिसर्‍या सेटमध्ये पाहायला मिळाला.

फ्रेंच स्पर्धा व माझे विजेतेपद याचे अतूट नाते आहे. या चाहत्यांच्या प्रोत्साहनामुळेच मला दहाव्यांदा विजेतेपद मिळवता आले आहे. दहा विजेतेपदे हा माझ्यासाठी खूप वेगळा आनंद आहे. वॉविरकाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला. अंतिम फेरीचे त्याने दडपण घेतले होते, अन्यथा त्याने जिद्दीने लढत दिली असती.
– राफेल नदाल