नदीजोड प्रकल्पाला चालना

0

मुंबई । राज्यतील शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या चक्रात सापडलेला शेतकरी यावरून सरकार कायमचा उपाय करणार आहे. यासाठी अटलजींचा स्वप्न प्रकल्प मानल्या जाणार्‍या नदीजोड प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातून होणार आहे. या प्रकल्पाची पहिली बैठक गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर होणार आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, वर्षानुवर्ष दुष्काळात सापडलेला शेतकरी यासाठी कायमचा उपाय म्हणून राज्यात नदीजोड प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.

या प्रकल्पासाठी पहिली बैठक गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे होणार आहे. या बैठकीत केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून, जलसंधारण विभागाचे केन्द्रीय सचिव, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच जलसंपदा विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्राकडून 11 हजार कोटींचा निधी उपलब्ध होणार असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पार, तापी आणि नर्मदा या नद्यांना बोगद्याच्या माध्यमातून जोडणार.