नदीत बुडून पोलिसाचा मृत्यू

0

मिरज – २४ जूनपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी हणमंत मोरे (वय ५४, रा. राजगड अपार्टमेंट, पोलीस लाईन, विश्रामबाग) यांचा मृतदेह निलजी येथे कृष्णा नदीच्या पात्रात आढळून आला.

हणमंत मोरे यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवार दि. २४ जूनपासून ते बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांची पत्नी प्रभावती हणमंत मोरे (वय ४६) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात हणमंत मोरे हे बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. काल निलजी येथे कृष्णा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह सडलेल्या स्थितीत असून मधुमेहाने त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.