नदीपात्रात बुडवून एकाची केली हत्या; पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील घटना

0

पंढरपूर  :  गुरसाळे ता. पंढरपूर  येथील भीमा नदीच्या पात्रात एका व्यक्ती च्यां पायाला दगड बांधून नदीपात्रात टाकण्यात आले आहे. यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

ही घटना समजताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, पो. नि. धनंजय जाधव व अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. भीमा नदी पात्रातील मृतदेह बाहेर काढून, सदर व्यक्ती कोण आहे. त्या व्यक्तीची पाण्यात बुडवून कोणी हत्या केली यासह अन्य प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांकडून होत आहे.