नदीपात्रात मृतदेह 

0
आळंदी : चर्‍होली बुद्रुक (ता.हवेली) येथील इंद्रायणी नदीपात्रात एका जेष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. आबासाहेब दाभाडे यांनी फिर्याद दिली. मृतदेहाचे वर्णन यामध्ये वय अंदाजे 60 वर्षे, प्रेताच्या अंगावर कपडे नाहीत. कमरेला लाल रंगाचा करगोटा असून चेहरा पूर्णपणे सडला आहे. मृताचे नातेवाईकांनी आळंदी पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस हवालदार महेश साळुंखे तपास करीत आहेत.