नदी घाट विकास प्रकल्पांतर्गत 65 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्र्यांचा हिरवा कंदील

0

शहाद्यातील गोमाई नदीकाठावरील वसाहतीचा होणार विकास ; खासदारांसह जि.प.सदस्यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा- शहरासाठी नदी घाट विकास प्रकल्पांतर्गत 65 कोटींच्या निधीच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हिरवा कंदील दिला. जिल्हा परिषद सदस्य अभिजी पाटील यांच्या मागणीला व खासदार डॉ.हिना गावित यांचा पाठपुराव्याला यश आले आहे. शहादा शहरालगत गोमाई नदी वाहते. नदी नदीच्या काठावर काही वसाहती आहेत. दरम्यान जुने तिखोरा पूल ते पिंगणा पूल दरम्यान नदी घाट विकास प्रकल्प अंतर्गत सुमारे 65 कोटींच्या निधीची मागणी शहादा पालिकेतर्फे केंद्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या संबंधीचे प्रस्ताव व निवेदन खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परीषद सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, संदीप पाटील, नाना निकुंबे ,संतोष वाल्हे,निलेश पाटील ,संजय साठे ,रेखा पटेल, जितू जमदाडे ,रिमा पवार ,साजीदअन्सारी आदींच्या वतीने संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन व प्रस्ताव देण्यात आला. अशा स्वरूपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून नदीकाठावरील गावात रहिवाशांच्या समस्या सुटणार आहेत. असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणारी ब वर्ग नगरपालिका राज्यातील एकमेव नगरपालिका असू शकते, असा सूर या वेळी भेटीदरम्यान उमटला

शहर विकासासाठी प्रयत्न -अभिजीत पाटील
केंद्र शासनाने या मागणीच्या सकारात्मक विचार केल्याच्या निश्चितच आनंद आहे. त्यामुळे शहादा शहराची प्रतिमा देशपातळीवर जाईल यात कुठलीही शंका नाही. शहराच्या सौंदर्यकरणासाठी अधिकाधिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न असल्याचे जिल्हा परीषद सदस्य अभिजीत पाटील म्हणाले.