नदी पुनरुज्जीवनाचा पहूरच्या शिक्षकाने केला जागर

0

शंकर भामेरे विज्ञान प्रदर्शनात द्वितीय

पहूर – येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांच्या ‘ केव्हा घेतील जिवनदायीनी नद्या मोकळा श्वास?’ या प्रकल्पास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोकसंख्या शिक्षण माध्यमिक शिक्षक गटातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयात नुकतेच तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. नगराध्यक्षा साधना महाजन, पं.स.सभापती रुपाली पाटील, जि.प.सदस्या विद्याताई खोडपे, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, केंद्र प्रमुख भानुदास तायडे, सुभाष कुमावत, ग.स. सोसायटी संचालक अनिल गायकवाड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थांनी प्रकल्पाविषयी माहीती जाणून घेतली.

विविध उपकरणांचे सादरीकरण
गावातील सांडपाणी नदीत सोडणे, कचरा टाकणे, मुर्त्यांचे विसर्जन, नदीपात्रातील अतिक्रमणे आदी कारणांमुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे श्री.भामेरे यांनी प्रोजेक्ट द्वारे दाखवून दिले. नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी लोकसहभागासह प्रशासनिक उपाय योजना त्यांनी सुचविल्या आहेत. त्यांच्या प्रकल्पास द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून यापूर्वीही त्यांनी बेटी बचाव, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आदी सामाजिक विषयांवर तालुका, जिल्हास्तरावर प्रकल्प सादर केलेले आहेत. त्यांच्या यशाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.सी. धनके, आर.पी. दुसाने, संस्थाध्यक्ष बाबुराव घोंगडे, केंद्र प्रमुख रामचंद्र वानखेडे, सरपंच ज्योती घोंगडे, मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे, प्रभारी मुख्याध्यापिका के.ए.बनकर, एच.बी. राऊत, अजय देशमुख आदींनी अभिनंदन केले.