सणसवाडी । नद्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून सध्या नद्या हंगामी व प्रदुषित बनत चालल्या आहेत. यामागे घटते पर्जन्यप्रमाण आहे. बेसुमार वृक्षतोड, जंगल नष्ट होणे यातून वाचविण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाचे असल्याचे मत शिक्रापूर विद्याधाम प्रशालाचे उपप्राचार्य रामदास शिंदे यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेचा अकरावीमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी सूरज चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले, त्याच्या स्मरणार्थ त्याच्या मित्रपरिवाराच्या वतीने नदी किनारी शंभर झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून वृक्षारोपणाची सुरुवात शिंदे यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य रामदास शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, बाबुराव कोकाटे, पत्रकार शेरखान शेख, सूरज प्रजापती, ओंकार महाजन, अनिल सोंडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना नदी वाचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानाची माहिती देण्यात आली. उपप्राचार्य शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली.