नमो ग्रुपच्या भुसावळ तालुका संयोजकपदी नंदकिशोर बडगुजर यांची निवड

0

भुसावळ- नमो ग्रुप फाऊंडेशनच्या भुसावळ तालुका संयोजकपदी भुसावळातील नंदकिशोर अरुणशेठ बडगुजर यांची निवड करण्यात आली. उपेक्षित व विस्थापीत घटकांच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात जिल्हाध्यक्ष डॉ.केयूर धनंजय चौधरी यांनी म्हटले आहे. सामान्य जनतेचे सामाजिक, शैक्षणिक प्रश्‍न सोडवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक गावासह वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्याची जवाबदारी बडगुजर यांच्यावर टाकण्यात आली आहे.