नयम मोंगियाने मोडला वडिलांचा विक्रम

0

बडोदे । कुठल्याही पित्याला आपला मुलगा आपल्याहून सरस असावा असे वाटत असते. आणि वडिलांपेक्षा मुलांनी एक पाऊल पुढे टाकले असे आपण अनेकदा ऐकतो. असेच काहीसे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकिपर नयन मोंगियाच्या मुलाच्या बाबतीत झाले आहे. मोहित मोंगियाने आपल्या वडिलांचा विक्रम मोडत क्रिकेट क्षेत्रात एक पाऊल पुढे ठेवले आहे.

नयन मोंगिया भारतीय संघात विकेटकिपर -फलंदाज होते. मोंगियाचा मुलगा मोहितने हल्लीच 19 वर्षाखालील क्रिकेट संघात धुमाकूळ घातला आहे. मोहितने एका स्पर्धेमध्ये आपल्या वडिलांचा 30 वर्ष जुना विक्रम तोडला आहे. मोहित मोंगियाने कूच बिहार ट्रॉफीमध्ये बडोदा संघाचे कर्णधारपद सांभाळले. या स्पर्धेमध्ये मोहितने आपल्या वडिलांचा 30 वर्ष जुना सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला आहे. मोहितने मुंबई विरूद्ध 245 चेंडूत नाबाद 240 नाबाद धावा केल्या आहे. ही बडोद्यातील कूच बिहार स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्कोर आहे.