शिंदखेडा । तालुक्यातील नरडाणा येथे रेल्वे स्थानकावर जलद गाड्यानां थांबा मिळावा यासाठी. दुस-या दिवशी देखील नरडाणा रेल्वे संघर्ष समिती चे उपोषण सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण हेमंत साळुंखे यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेवून आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच रेल्वेचे अधिकारी किशोर माखाना यांच्याशी चर्चा करून तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. तालुक्यातील नरडाणा हे गांव शिरपूर -धूळे येथील प्रवाश्यांना रेल्वे साठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी सुरत- जळगांव प्रवास करीत असतात. लांबचा रेल्वे प्रवास करण्यासाठी या प्रवाश्यांना अमळनेर किंवा नंदूरबार येथे जावे लागते व तेथून रेल्वे मिळते यांत प्रवाश्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातात म्हणून नरडाणा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यानां थांबा मिळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यांनी दिली उपोषणस्थळी भेट
उपोषणकर्त्याची तहसीलदार सुदाम महाजन रेल्वेचे अधिकारी किशोर माखाना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे यांनी भेट घेतली.आंदोलनकर्त्यांनी नरडाणा बंदची हाक देवून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. रेल्वेचे अधिकारी किशोर माखाना यांच्याशी झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. आंदोलनात महेंद्र सिसोदे राजेश सिसोदे योगेश सिसोदे शशिकांत सिसोदे सतिश सिसोदे राहुल सिसोदे पंकज सिसोदे आनंदा पाटील योगेश जाधव संदिप गिरासे साहेबराव ईशी अंकुर साळुंखे मयूर सिसोदे यांसह नरडाणा ग्रामस्थ उपोषणात सहभागी आहेत.
नरडाणा ग्रामस्थांनी रेल्वे थांबा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे.नरडाणा हे गांव परिसरातील अनेक प्रवाश्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे. आगामी काळात हे रेल्वे स्टेशन जंक्शन होणार असले तरी त्यास अनेक वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या ग्रामस्थांची मागणी योग्य असून यावर तात्काळ समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा या आंदोलनात शिवसेना देखील उतरेल व आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
– हेमंत साळुंखे, शिवसेना जिल्हाध्यक्ष ग्रामीण