नरडाणे, झीरवेत भारतीय जैन संघटनेतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठी जेसीबी

0

शिंदखेडा । तालुक्यात 8 एप्रिल पासून सुरु असलेल्या पानी फॉउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे साठी तेथील ग्रामस्थानी केलेल्या श्रमदानाल जोड़ म्हणून आज नरडाणे व झीरवे गावांना जेसीबी भारतीय जैन संघटनेकडुन देण्यात आले. झीरवे येथे मशीन कामाचा आरंभ तेथील सरपंच शालुबाई राजेंद्र वाघ यांच्या हस्ते उद्वघाटन करण्यात आले. यावेळी प्रतिभा संभाजी पाटिल , कविता रामकृष्ण पाटिल देखील उपस्थित होत्या. या महिलांनी पाणी फॉउंडेशन चे चार दिवसीय लामकानी येथील निवासी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

शेवटे 10 दिवस शिल्लक
राप्रसंगी शालुबाई वाघ म्हणाल्या, आमच्या गावाला पाण्याचे दृभिर्क्ष आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन आमच्यासहित ग्रामस्थानी श्रमदान केले आहे. याला मशीनची जोड म्हणून भारतीय जैन संघटनेने जेसीबी देऊन मोठे काम केले आहे. जास्तीत जास्त तास मशीन वापरून शासनकडुन दीड लाख रुपये डिजेलसाठी आलेल्या निधिचा वापर करुंन घ्यावा. त्यासाठी संघटनेचे संस्थापक श्री शांतिलालजी मुथा यांनी 250तासांची मर्यादा काढून टाकून अमर्याद तास जेसीबी निःशुल्क वपरण्याची समंती दिली आहे. आता स्पर्धेचे केवळ 10दिवस शिल्लक आहे. आपणअजुन एक जेसीबी लावू शकतात असे प्रा.डागा यांनी सांगतिले.

झीरवे गावात जादा जेसीबी
झीरवे गावात ग्रामसेविका सारिका गीते यांच्या पतीचे स्व मालकिचे एक जादा जेसीबी मशीन लावण्यात येणार आहे. या मशीन कामाच्या उद्घाटान प्रसंगी भारतीय जैन संघटनेचे ग्रामीण जिलाध्यक्ष अशोक कुचेरिया, जिल्हा सचिव रविन्द्र टाटिया, दोंडाईचा शहर अध्यक्ष जितेंद्र बिनायक्या,साचिव शेखर कोठारी, डॉ. बी. एम. जैन, धनराज श्रीश्रीमाळ,प्रशिक्षण घेऊन आलेले नाना पाटिल, रामकृष्ण पाटिल, महेश पाटिल, एकनाथ पाटिल, संभाजी पाटिल, सुरेश पाटिल, संजय पाटिल, नीलेश पाटिल हितेश पाटिल, गणेश पाटिल, जेसीबी मशीन मालक जयराम पाटिल, भगवान पाटील उपस्थित होते. आभार देवमन पाटिल यांनी मानले.

सरपंच बोरसेंच्याहस्ते उद्घाटन
नरडाने येथे सरपंच मंसाराम बोरसे यांचे हस्ते उद्घाटन केले. भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक अतुल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. उप सरपंच अनिल सिसोदे,ग्रामसेवक विजय सैंदाने,भारतीय जैन संघटनेचे डॉ. प्रितेश बोथरा, सतिष चोरडिया, सुभाष संकलेचा, नितेश जैन, नितिन जैन,सुनील बाफना,मुकेश जैन,संजिवनी सिसोदे, फरीदा बोहरी, भालेश भामरे, महेंद्र सीसोदे, संदीप गिरासे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.