पुरातत्वत्व शास्त्रज्ञांना आपला नरभक्षक इतिहास दीर्घकाल माहित आहे पण हजारो वर्षांपूर्वीची माणसंच माणसांना का खात होती याचं कोड अजून उलगडलेलं नाही. आता १५ हजार वर्षांपूर्वींच्या माणसाची मंत्रविधींची चिन्हे असलेली कोरीव हाडे या गुढ प्रकाराचं उत्तर देतील असं शास्त्रज्ञांना वाटत आहे. पाषाणयुगातील माणसाच्या वर्तनाचा आलेख शास्त्रज्ञांनी मांडला आहे. मृत शरीरांमधील हाडांमधील मर्गज काढल्यानंतर आणि मांस खाल्ल्यानंतर माणसांची टोळी या हाडांवर नक्षी काढीत असे. माणसाच्या कवटीचा उपयोग कप सारखा करीत असत.
माणसं खाणं केवळ भुक किंवा भरणपोषणासाठी नव्हतं तर त्याला वेगळे आयाम असावेत असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. मृत्युचे तांडव असलेला नरभक्षक माणसांचा विधी दक्षिण इंग्लंडमधील गाऊज केव्ह या ठिकाणी झाल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. कवट्यांचे रूपांतर पेयपान करण्यासाठी किंवा डिशसारखा केल्याचे पाहुन सर्वचजण हादरले. याच विभागात ३० वर्षांपूर्वी सिल्विया बेलो या मानववंश शास्त्रज्ञांनी मंत्र-तंत्र नरभक्षण विधीचा दुसरा पुरावा शोधला. त्यांना उजव्या हाताचे लांब हाड सापडले. त्यावर झिगझॅग आकार काढला होता. आता कवटी सापडल्यामुळे ठोस निष्कर्ष काढले आहेत. आधी माणसाचे मांस काढले जाई. नंतर हाडांवर चिन्हे काढली जात. हे झाल्यावर हाडांमधील मर्गज काढण्यासाठी ते दुभंगले जात असे. हा विधी पूर्ण झाल्याशिवाय नरभक्षक लोक मांसभक्षण करीत नसत. बेलो म्हणतात ज्याचा बळी दिला जाई तो आदरणीय व्यक्ती असला पाहिजे. हाडांवर नक्षीकाम करणे त्याच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी असू शकते. त्या व्यक्तीचे ज्ञान संक्रमित करण्यासाठी कदाचित कवटीतून अन्न व पेय घेतले जात असावे, असे बेलो यांना वाटते.