नरवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

0

नीरा । इंग्रज सरकार विरोधात सर्वात प्रथम सशस्त्र आंदोलन उभारणारे नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती नीरा व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्‍या उमाजी नाईक यांच्या शौर्याचे त्यावेळच्या ब्रिटीश अधिकार्‍यांनीही कौतुक केले होते. आपल्या समाज बांधवांना संघटीत करून क्रांतीचा प्रेरणादायी लढा उभारणार्‍या उमाजी नाईकांची यावर्षीपासून शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालयातून व गावोगावच्या कार्यकर्त्यांनी उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली. नीरा येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब भोसले व बबन खोमणे यांनी प्रतिमापूजन केले. याप्रसंगी सदस्य अनिल चव्हाण, शाम जाधव, सुरेश चव्हाण, सुजाता जाधव, संभाजी जाधव, सुदर्शन होळकर, रवी जाधव, सुनील पाटोळे, लक्ष्मण जाधव, अप्पा मदने, रोहिदास जाधव, संगीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होत्या.

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती शासकीय कार्यालयातून साजरी करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह्य असून याकरीता सर्वांच्यावतीने राज्य सरकारचे आभार मानतो, असे बबन खोमणे यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेब भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सुजाता जाधव यांनी आभार मानले. गुळुंचे येथेही उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात माजी उपसरपंच भानुदास पाटोळे व ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के तसेच तरुणांनी प्रतिमापूजन केले. तत्पूर्वी सकाळी 7 वाजता भिवडी येथून क्रांतीज्योत आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व उमाजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.