पार्थिवाला त्यांचे पुत्र-पियुष पाटील यांनी दिला अग्नीडाग
जळगाव । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील (वय 58) यांचे रविवार, 29 रोजी सकाळी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. 2 जुलै रोजी ते आपल्या घरातील जिन्यावरुन पडल्याने त्यांच्या मानेच्या मणक्याला दुखापत झाली होती. काही दिवस जळगावला उपचार घेतल्यानंतर त्यांना पुणे येथे हलविण्यात आले होते. त्यांच्या2 निधनाचे वृत्त कळताच जळगावकर हळहळले. त्यांची अंत्ययात्रा शहरातून ठिकठिकाणाहून नेरी नाक्यातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्ययात्रेत असंख्य नागरिक, समर्थकांनी सहभाग घेतला. त्यांचा शहरात चांगला दांडगा जनसंपर्क असल्याने स्माशात भूमीत नातेवाईकांसह शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी होती.
नरेंद्र अण्णांची अंत्ययात्रा सकाळी दीक्षित वाडीतून निघाली. जिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात अंत्ययात्रा नेण्यात आली. तेथे विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकांनी अंतिम दर्शन घेतले. नंतर अंत्ययात्रा गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा मार्गे महापालिकेसमोर आणण्यात आली. तेथे समर्थकांनी श्रद्धांजली वाहिली. टॉवर चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौकमार्गे वैकुंठधामात अंत्ययात्रा आणण्यात आली. पाटील यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र-पियुष पाटील यांनी अग्नीडाग दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ, एक बहिण, मेहुणे, आप्तस्वकीर असा परीवार आहे.