जळगाव– आशा फांउडेशनतर्फे स्व.पी. आर. पाटील पुरस्कारासाठी धुळे येथील न्यू. सिटी हायस्कुलचे उपमुख्याध्यापक नरेंद्र जोशी यांची तर
स्व.लताताई पाटणकर पुरस्कारासाठी जळगावातील डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस.राणे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजी रोटरी भवन, मायादेवी नगरच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता गौरविण्यात येणार आहे.
आशा फांउडेशन संस्थेमार्फत दरवर्षी शिक्षकदिनी कृतज्ञता समाजशिक्षकांप्रती हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. यावर्षी सर्वश्री डी. एच. बोरवले, रमेश रुमाले , डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रिया दारा , सतीश पाटील , सागर धनाड , शिरीष बर्वे, शरद भालेराव व कांचन संत यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा. शरच्चन्द्र छापेकर उपस्थितराहणार आहे. सोमवार, पिढी घडविणार्या शिक्षकांच्या सन्मान प्रसंगी उपस्थितीचे आवाहन कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी यांनी केले आहे.