भुवनेश्वर:लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हिंचाराचे प्रकार समोर येत आहे. ओडीसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याची सभा होणार आहे. तत्पूर्वी तेथील एका भाजप कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगुली जेना असे भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. ते खोर्धा मंडळाचे भाजपाध्यक्ष होते. पोलिसांकडून घटनेची चौकशी केली जात आहे.
मंगुली जेना बडापोखारीया या गावाचे माजी सरपंच होते. भाजप याविरोधात बंदचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करत ठिय्या मांडला होता.
ओडीसामध्ये भाजप आणि बिजू जनता दलात मुख्य लढत पाहायला मिळत आहे.