नरेंद्र मोदींना लवकरच पर्याय उभा राहणार!

0

मुंबई:- देशात सध्या अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही स्थिती लवकरच बदलेल. नरेंद्र मोदींना पर्याय लवकरच उभा राहील व तो पर्याय काँग्रेस नसेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे खा. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 3 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पत्रपरिषदेसाठी ते आले होते. यावेळी जनशक्तिशी बोलताना त्यांनी गुजरात निवडणुकीनंतर मोदींना पर्याय उभा राहिल्याचे दिसून येईल असे सांगितले. यावेळी जीएसटीबद्दल त्यांना विचारले असता ‘सरकारला जीएसटी उदघाटनाचा आनंद घेऊ द्या. मग जीएसटीवर बोलू’ असे खा. आंबेडकर यांनी सांगितले.

-राष्ट्रपती पदासाठी इच्छुक नव्हतो
राष्ट्रपती पदासाठी मी इच्छुक नव्हतो, असेही यावेळी खा. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. माध्यमांमध्ये अनेक उलट-सुलट बातम्या आल्या मात्र मी पहिल्यापासूनच राष्ट्रपती पदासाठी इच्छुक नव्हतो, असे त्यांनी सांगितले. याउलट मी काँग्रेसला राष्ट्रपती पदासाठी आदिवासी उमेदवार द्या असे देखील सांगितले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

सरकारचा अजेंडा वाईट
निष्पाप लोकांना मारून टाकण्याचा अजेंडा हे सरकार चालवीत असल्याचा आरोप करत हा अजेंडा वाईट असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी केला. माणस मारण्याला मोदींचा पाठिंबा असल्याचे चित्र देशात दिसत असल्याचे ते म्हणाले. देशात विघटणाची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे असे खा. आंबेडकर म्हणाले.