मुंबई: शिवसेना-भाजपची युती महाराष्ट्राच्या राजकारणामुळे तुटली. विधानसभा निवडणूक सोबत लढविल्यानंतर भाजप-शिवसेनेची फारकत झाली. विधानसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपात आरोप-प्रत्यारोप झालेत. मोदींवर देखील आरोप झालेत. दरम्यान आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान म्हणून मोदींनी अनेक धाडशी आणि कौतुकास्पद निर्णय घेतले. ३७० हटविणे हा मोठा धाडशी निर्णय मोदींनी घेतला आहे. त्याचे कौतुकच परंतु लोकशाहीला काळीमा फासले जाईल असे कृत्य मोदींनी करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते.
दिल्लीतील जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा रक्त सांडला आहे. त्या विद्यार्थी संघटनेचे विचार जरी पटणारे नसले तरी विद्यार्थ्याचे रक्त सांडणे निषेधार्य आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले.