नरेंद्र मोदी देशातील सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान : अजित सिंह

0

मुरादाबाद । राष्ट्रीय लोकसंघाचे उत्तर प्रदेशातील अस्तित्व संपुष्टाटात आल्याने संतापलेल्या राष्ट्रीय लोकसंघाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निषाणा साधला आहे. आतापर्यंतचे देशातील सर्वाधिक खोटारडे, लबाड पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे वक्तव्य राष्ट्रीय लोकसंघाचे अध्यक्ष अजित सिंह यांनी केले. ते पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमधील कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.

अजित सिंह यांनी मंंगळवारी मुरादाबाद येथील पितलनगर येथे कार्यकार्ते मेळाव्याला उपस्थिती दर्शविली होती..
मोदी हे असे पहिलेच पंतप्रधान आहेत जे कोणत्याही कामकाजाचे श्रेय स्वतःकडे घेतात. जर ते श्रीलंकेमध्ये असते तर रावणाला मीच मारले असेही मोदींनी सांगितले असते. मोदी सरकार प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरली आहे. मोदी सरकारच्या 4 वर्षांत आणि योगी आदित्यनाथ यांच्या 1 वर्षाच्या कालावधीत कोणतेच विकासकाम झालेले नाही. आता नोटबंदीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. देशाचा आणि राज्यांचा विकास ठप्प झाला आहे. अशा वेळी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तरच एक चांगली सरकार बनेल आणि विकास होईल. मोदी सरकारला पराभूत करायचे असेल तर विरोधकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या काळात देशभरात बेरोजगारी वाढत चालली आहे. देशातील शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. वीज बिल वाढत आहे. भ्रष्टाचार वाढत आहे. लोक वैतागले आहेत, असे अजित सिंह यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केले.