मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाहीय. जोवर विरोधकांकडे असा चेहरा येत नाही, तोवर कोणतीच संधी नाही. 2024 मध्य़े कोणत्याही चेहऱ्याशिवाय मोदींना हरविणे कठीण असेल. यासाठी शरद पवार योग्य आहेत, असे वक्तव्य शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काँग्रेस हा इतिहासजमा झालेला पक्ष असल्याचेही राऊत म्हणाले.
निवडणूक राष्ट्रपती पदाची, पंतप्रधान किंवा अन्य कशाची असेल. आपल्या देशात विरोधकांची एकजूट हीच एक गहण समस्या आहे. राज्यातला विरोधी पक्ष बादशाह मानतो. मी सांगेन तेच आणि तोच नेता. या विरोधकांची एकजूट होणे गरजेचे आहे, परंतू त्यांना एक नेता असणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले. शरद पवारांनी विरोधकांना एकत्र करण्यात अनेकदा महत्वाची भूमिका निभावली आहे. ते योग्य आहेत. ममता बॅनर्जीदेखील टक्कर देतील असे अनेकांना वाटत आहे. सर्व विरोधकांनी एकत्र बसल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही, असे देखील राऊत यांनी सांगितले.