शहादा । तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे आयोजित नर्मदा खोर्यातील एकात्मिक जल आराखडा मसुदा बाबत लाभार्थी वापरकर्ते व संबंधित घटकांशी सल्ला मसलत करण्यासाठी 31 जाने रोजी लोकमान्य टिळक टाऊन हॉल शहादा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नर्मदा खोर्यातील विस्थापित व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या कार्यत्यांनी आराखाड्याला विरोध केला. पेसा कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन आराखडासाठी मंजुरी घेतली पाहिजे. मात्र तापी खोरे विकास महामंडळ व नर्मदा विकास महामंडळांनी परस्पर आराखडा तयार केला. या आराखड्यात 10.89 टीएमसी नर्मदेचे पाणी तापी खोर्यात व 5 टिएमसी पाणी उकाई धरणारा सोडण्याचा घाट अधिकार्यांनी घातला याला आमचा विरोध आहे, असे मत नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्यांना मेधा पाटकर यांनी मांडले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर विविध प्रश्न मांडुन अधिकार्यांना धारेवर धरले. यावेळी बैठकीत ससप्रचे जिल्हाधिकारी दत्ता बोरुडे, उपजिल्हाधिकारी श्री वळवी नर्मदा विकास महामंडळाचे श्री सोनवणे, माजी मंत्री पद्माकर वळवी, सुहास नाईक. रतन पाडवी, सी.के.पाडवी, प्रा.शाम पाटील, चेतन साळवे, योगिनी खानोलकर, अनिक कुवर, लतिका राजपुत, आदींसह नर्मदा खोर्यातील विस्थापित मोठ्या संख्येने उपस्थित होते.