नर्मदा परिक्रमा भाविकांचा सत्कार

0

आळंदी : नर्मदा परिक्रमा करून आलेल्या भाविकांचे हरिनाम गजरात आगमन आणि या निमित्त सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. वसंत नामदेव गायवाल शास्त्री व आत्माराम महाराज नांदे शास्त्री बीड यांनी हरण गजरात नर्मदा परिक्रमा केली. आळंदीत शास्त्रीचें आगमन होताच हरिनाम गजरात दिंडीने स्वागत झाले.

पुंडलिक मंदिर येथून नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात सुरु झाली. कीर्तन व महाप्रसाद वाटप, स्वागत, सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांचे आळंदीकरांनी स्वागत केले. यावेळी प्रथम आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उद्योजक अनिल वडगावकर, ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, नगरसेवक सचिन गिलबिले, अरुण घुंडरे आदींनी सत्कार केले.