नवापुर । नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नळ पाणी पुरवठयाचे विद्युत जोडणी खंडीत केल्याबाबतचे निवेदन नवापुर तालुका कॉग्रेस कमिटीतर्फे विज कार्यालयात जाऊन विज अभियंता बी.एस.कोळे यांना देण्यात आले. गेल्या चार दिवसापासुन नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नळ पाणी पुरवठयाचे विद्युत जोडणी विद्युत वितरण कंपनीने कोणतीही सुचना,लेखी पञ न देता अचानक विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.त्यामुळे तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यापासुन वंचित ठेवण्याचे पाप विद्युत वितरण कंपनीने केलेले आहे.त्यामुळे नवापुर तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
पाणी पिण्यासाठी वापरले तर आरोग्याला धोका
पावसाळयाचे दिवस आहेत व नदीनाल्यांना पाणी आलेले नाही.जर कुठुन गढुळ पाणी लोकांनी पिण्यासाठी वापरले तर त्यापासुन आरोग्याला धोका निर्माण होऊन एखाद्या साथीची लागण होण्याची शक्यता आहे.अशुध्द पाणी पिऊन जर कोणाचा बळी गेला तर त्याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी व शासन जबाबदार राहील.एकीकडे शासन पिण्याच्या पाण्याचे विजबिल थकित असेल तरी विजजोडणी खंडीत करु नये असे शासनाचे आदेश असतांना विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आपल्या मनमानी कारभाराने ग्रामपंचायतीचे विज जोडणी खंडीत करीत आहे.
शासनाने माहिती मागवुन वर्ष उलटले
विद्युत वितरण कंपनीकडुन शासनाने माहिती मागवुन वर्ष उलटले आहे.परंतु आजतगायत थकीत विजबिलबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. गांवामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाही.पिण्याचे पाणी हे जीवनावश्यक बाब असतांना विद्युत वितरण कंपनीने जनतेला धारेवर धरले आहे. या पिण्याच्या पाण्यासाठी आणि विज बिल लवकर भरण्यासाठी आता लोकांनवर शासन एफ.आय.आर दाखल करु अशी धमकी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी देत आहे.
कंपनीने तात्काळ विज जोडणी करावी
पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर जर विद्युत वितरण कंपनीने तात्काळ विज जोडणी केली नाही तर विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा व रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.त्याचे वाईट परिणाम विद्युत वितरण कंपनीला भोगावे लागतील. निवेदनावर नवापुर तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत,उपाध्यक्ष आर.सी. गावीत,पं.स उपसभापती दिलीप गावीत,न.पा गटनेते गिरीष गावीत,बाळु गावीत,रोबेन नाईक,भालचंद्र गावीत,अर्जुन वळवी,संजय गावीत,विनय गावीत,गुलाबसिंग वळवी,एम.एन.वसावे,सुभाष गावीत,जे.के गावीत,प्रताप गावीत,आशिष मावची,राहुल गावीत,विकास गावीत,विनायक गावीत,अनिल वसावे,अरुण गावीत,विकास वसावे,काळुराम गावीत,फुलसिंग मावची,अमेश गावीत,तेजस वसावे यांचा सह्या आहेत यावेळी भरत गावीत यांनी निवेदनाबाबत सविस्तर चर्चा केली.