नवजात अर्भक हरवले

0

पिंपरीः येथील नाणेकर पुलाजवळ महिलेची तिची प्रसुती होऊन बाळ जन्माला आले. मात्र महिलेची प्रकृती बिघडल्याने बाळाला तेथेच सोडून तिला वाचवण्यासाठी पळापळ सुरु होते. मात्र या गोंधळात बाळ हरवते. कोणाचेही मन हेलावेल अशी ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

कुरळीफाटा येथे ही महिला राहते. सहा महिन्यांची गरोदर असतानाच तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे ती व तिचा पती पायी चालत रुग्णालयात जात असताना नाणेकर पुलाजवळच महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र यावेळी आईचीही प्रकृती खालावल्याने पतीला बाळाला घेऊ की आईला वाचवू अशी परिस्थिती निर्माण झाली. पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याने अर्भकास तेथेच ठेवून पतीने पत्नीला शिक्रापूर रोड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र पत्नीचीही प्रकृती जास्तच खालावल्याने तेथून पुढील उपचारासाठी महिलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले. मात्र, या पळापळीत बाळ मात्र पुलाखालून गायब झाले. याची खबर वायसीएम पोलिसांनी चाकण पोलिसांना दिली असून ते पुढील तपास करत आहेत.