भुसावळ-जळगाव दरम्यानची घटना : वाढत्या चोर्यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट
भुसावळ- नवजीवन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 18 जून 2018 रोजी घडली असलीतरी रविवारी नंदुरबार लोहमार्ग पोलिसांकडून हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली. बारडोली येथील महिला प्रवासी आम्रवादी श्रीवास्ता (रा.कदोडरोड, बारडोली, गुजराथ) या 18 जून रोजी नवजीवन एक्स्प्रेसच्या ए-1 या वातानुकूलीत डब्यातील सीट 1 व 2 वरून प्रवास करीत असतांना गाडीने जळगाव स्थानक सोडल्यावर अवघ्या 10 मिनिटात महिलेचे पती बाथरूमला गेल्याची आणि महिला चार्जिंगला लावलेला मोबाईल पाहात असतांना त्यांची नजर चुकवून चोरट्यांनी महिलेची हॅण्ड बॅग लावबली. त्यात 60 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, 25 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकुण 2 लाख रूपयांचा मुद्देमाल होता.