मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने देण्यात आली आहे. अधिकृतरित्या आजपासून मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना निवासस्थान देण्यात आले आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’, मंत्री छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन, एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले देण्यात आले आहे.
मंत्र्यांना द्यावयाचे बंगल्याबाबत आज शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. अद्याप उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. लवकरच नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.