मुंबई । विधानपरिषदेवर निवडून आलेल्या चार सदस्यांचा शपथविथी आज झाला. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. रणजित पाटील आणि शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विक्रम काळे, ना.गो. गाणार, बाळाराम पाटील यांनी आज 14 फेब्रुवारी रोजी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना आज विधानपरिषद सभागृहात शपथ दिली. विधानभवनात झालेल्या शपथविधी समारंभास विधानपरिषदेचे सदस्य हेमंत टकले, सुनील तटकरे, शरद रणपिसे, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अध्यक्षांचे सहसचिव म.मु.काज, सचिव राजकुमार सागर, उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव उमेश शिंदे, रवींद्र जगदाळे, सुनील झोरे आदी उपस्थित होते.
पदवीधरसाठी निवड झालेल्या 4 जणांचा समावेश
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत डॉ. रणजीत पाटील अमरावती पदवीधर मतदार संघातून तर शिक्षक मतदार संघाच्या औरंगाबाद मतदारसंघातून विक्रम काळे, नागपूर विभागातून ना. गो. गाणार, कोकण विभागातून बाळाराम पाटील हे निवडून आले आहेत. त्यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.