भुसावळ : वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्यावतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेविका प्रतिभा वसंत पाटील, नगरसेविका अनिता सोनवणे यांचा रविवार 11 रोजी सकाळी 9.30 वाजता सत्कार करण्यात आला. यावेळी वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय ढाके यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा सत्कार केला.
अडचणी सोडविणार
नगरसेवक युवराज लोणारी यांचा सत्कार उपाध्यक्ष सिताराम भंगाळे यांनी केला तर प्रतिभा वसंत पाटील यांचा झांबरे यांनी सत्कार केला तसेच नगरसेविका अनिता सोनवणे यांचा चौधरी यांनी सत्कार केला. यानंतर ज्येष्ठ नागरीक संघाने लवकरात लवकर जागा उपलब्ध करण्यात येईल व ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यसाठी नगराध्यक्षांपासून ते नगरसेवक तत्पर राहतील, असे सत्कारमुर्तींनी यावेळी जाहिर केले.