जळगाव । ग्राहकांच्या व लोकप्रतिनिधीच्या मागणीमुळे नवप्रकाश योजनेची मुदत आर्थिक सवलतीसह तीन महिन्यापर्यत वाढविण्यात आली आहे. आता 31 जुलै 2017 पर्यंत पात्र थकबाकीदार ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. यापुर्वी विविध कारणांमुळे योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व पात्र ग्राहकांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री.बी.के.जनवीर यांनी केले आहे.
111 कोटींची थकबाकी
मुदतवाढीनंतरच्या नवीन बदलानुसार 1 मार्च ते 30 एप्रिल 2017 पर्यंत मुळ थकबाकी भरल्यास ग्राहकांना संपुर्ण 100% व्याज व विलंब आकार माफ होईल . 1 मे ते 31 जुलै 2017 पर्यंत मुळ थकबाकी भरल्यास ग्राहकांना 75 टक्के व्याज व संपुर्ण विलंब आकार माफ होईल. मागील चार महिन्याचे कालावधीत जळगांव परिमंडळातील 7 हजार 36 ग्राहकांनी सहभाग नोंदवित 4 कोटी 16 लाख 55 हजार रूपये थकबाकीचा भरणा केला आहे. नवप्रकाश योजनेत परिमंडळातील उर्वरीत पात्र ग्राहक 2 लाख 35 हजार 294 असून या ग्राहकांकडे 111 कोटी 80 लाख 45 हजार रूपये वीज बीलाची थकबाकी आहे.‘वीजपुरवठा खंडीत ग्राहकांना नवप्रकाश योजनेच्या माध्यमातून तो पुन्हा जोडण्याची संधी उपलब्ध आहे.