भुसावळ प्रतिनिधी दि 9
तालुक्यातील जि.प.शाळा मोंढाळे येथे (ता. ८) सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाच्या औचित्य साधून नवभारत साक्षरता अभियान या कार्यक्रमांतर्गत नवभारत साक्षरता वर्गाचे उद्घाटन मोंढाळे गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. रत्नाताई विलास सुरवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व वर्गाची सुरुवात करण्यात आली.
या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाताई सुरवाडे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले व सर्वांनी वर्गात नियमित हजर राहून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लीलाधर कोळी यांनी नव साक्षर विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक स्वयंसेवक व नव साक्षर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाला भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी . किशोर वायकोळे यांनी कार्यक्रम सुरू असतांना नव साक्षर विद्यार्थी तसेच सरपंच, स्वयंसेवक व शिक्षक यांच्यासोबत संवाद साधला सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. स्वयंसेवक म्हणून . उषा गणेश तायडे, . धनश्री सुनील पाटील, साविता ओकार कोळी यांना नियुक्त करण्यात आले सदर तीन वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले. वर्गाची वेळ सायंकाळी सात ते आठ अशी असेल.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव महाजन यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक . संगीता सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ. भारती अत्रे यांनी मानले.