भुसावळ- रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी तहसील कार्यालयास भेट देवून नवमतदार नोंदणीबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) रवींद्र भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, जिल्हा निवडणूक शाखेतील तहसीलदार सुरेश थोरात, भुसावळ येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात, बोदवड येथील तहसीलदार रवींद्र जोगाी, मुक्ताईनगर तहसीलदार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, निवडणूक नायब तहसीलदार विजय भालेराव, योगेश मुस्कवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी निवडणूक शाखेतील संगणक स्वत: हाताळत नवीन मतदारांची माहिती जाणून घेतली, किती फॉर्म आले आणि किती फॉर्म अपलोड झाले याची माहिती जाणून घेतली.