नंदुरबार । येथील समस्त दसा मोड नवयुवक मंडळातर्फे रूग्ण उपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन डॉ.रोशन भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी किशोरभाई वाणी,डॉ.नूतनभाई शाह,विनयभाई श्रॉफ, अदि उपस्थित होते.समाजातील व इतर रूग्णांसाठी नाममात्र दरात स्ट्रेचर,कमोड चेअर,व्हीलचेअर,एअर बेड,कफ सेक्शन मशिन,आय.व्ही.स्टॅन्ड, फाऊलर बेड,ऑक्सीजन फॉन्सेट्रेटर, बॅक रेस्ट अदि साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी किशोरभाई वाणी यांनी नवयुवक मंडळातर्फे समाजपयोगी कार्य होत असून या साहित्याचा उपयोग गरीब व मध्यम वर्गातील गरजू रूग्णांना होणार असल्याने या चांगल्या कार्यात सर्वाचे सहकार्य उपेक्षित असल्याचे सांगितले.
डॉ.भंडारी यांनी शहरात दिवसेंदिवस रूग्ण संख्येत वाढ होत असून विविध आजारांनी रूग्ण त्रस्त असतांना जिवनमान कमी झाले आहे. रूग्णांना कमी दरात साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम पहिलाच असल्याचे सांगितले.डॉ.नूतनभाई शाह व विनयभाई श्रॉफ यांनीही मनोगतात या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष राजूभाई कांचवाला,उपाध्यक्ष आशिष शाह,सचिव मितेश वाणी,कोषाध्यक्ष जयेश वाणी,विनम्र शाह,परेश शाह,नितीन शाह,सिध्दार्थ वाणी,गोपाल शाह,मनिष वाणी,राजीव शाह,राजेंद्र शाह,पियुष शाह,कुणाल शाह,विकासभाई शाह,बाबूभाई शाह,अमित शाह,निर्मल गुजराथी,जितेश शाह,योगेश शाह,अंकलेश शाह,दिपक शाह,उदित शाह,निखील शाह,विरेंद्र शाह,सचिन शाह अदि सहकार्य करीत आहेत. सुत्रसंचालन व आभार सजंय गुजराथी यांनी मानले.